अक्षय कुमारमुळे सलमान खान आलाय टेन्शनमध्ये, वाचा काय आहे कारण

सलमानचा दबंग ३ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर सलमान आता राधे : इंडियाज मोस्ट वॉण्टेड या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी सलमान खान आणि दिग्दर्शक प्रभूदेवा यांनी जोर लावला आहे. राधे चित्रपटाबाबत सलमान खानचे चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटानी मुख्य भूमिकेत असून या चित्रपटात सलमान एका हटके भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच 22 मे ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता जॅकी श्रॉफ देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे.
सलमानच्या राधेसोबतच अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब देखील 22 मेलाच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.