प्रत्येक क्षेत्रात आजही जातीयवादी द्रोणाचार्य अजून जिवंत आहे.
*"आरक्षण "* का असावं?
किंवा *"आरक्षणाला"* का पाठींबा द्यावा, हे वास्तव चित्र उभ करणार आहे ?
खरंच देशाला पुढ जायचं असेल तर आरक्षणाची गरज आहे का ?
पहिल्यांदा वाचनीय माहिती आली वेळ काढून नक्की वाचा, जातीय वादापुढं नेहमी गुणवत्तेला पुन्हा पुन्हा ठरवलं जातंय कवडीमोल ?
*जातीयवादी द्रोणाचार्य अजून जिवंत आहे.*
नाव :- *अर्जुन तेंडुलकर*
वय वर्षे :- १५
वडील :- सचिन तेंडुलकर
कामगिरी :- सचिनचा मुलगा या व्यतिरिक्त जास्त काहीही नाही.
नाव :- *प्रणव धनावडे*
वय वर्षे :- १५
वडील :- रिक्षा चालक
कामगिरी :- *३२७ चेंडूत १००९* धावांची नाबाद वर्ल्ड रेकॉर्ड खेळी.
*पंधरा वर्षाच्या वयात हजार धावा करून विश्व रिकार्ड प्रस्थापित करून देखील प्रणव धनावडेला १६ वर्षांखालील भारतीय क्रिकेट टीममध्ये न निवडता काही खास कामगिरी न केलेल्या अर्जुन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे.*
द्रोणाचार्यासारखा जातीयवाद जिवंत आहे म्हणून तर एकलव्याला आरक्षणाची गरज आहे !!...
भारतातील आरक्षणाची सत्य वस्तुस्थिती सांगणारी ही मांडणी यावर सावध जातीयवादी प्रतिक्रिया देणार होते हे निश्चित. सोशल मिडियापासून तर दूरचित्रवाणी वरील सर्व ठिकाणी वरील बातमी खोटी असल्याचा कांगावा करण्यात आला......
परंतु सत्याला मरण नसतं, वस्तुस्थिती ही आहे.....
रिओ ऑलिंपिक बघितले की लक्षात येत की आरक्षण का असावं,
ऑलिंपिकमध्ये सर्व देशांना समान संधी असताना *आपल्या देशाची*🇮🇳ही निराशाजनक अवस्था का?
याच एकमेव उत्तर आहे......
*द्रोणाचार्य* अजून जिवंत आहे....
✔सशामागे🐇धावणाऱ्या🏃🏻फाशेपारध्याला रनिंग मध्ये संधी नाही🤔
✔रानावनात🐐बकऱ्या राखताना वाघाशी🐆झुंज देणाऱ्या धनगराला ज्युडोमध्ये स्थान नाही🤔
✔लहानपणापासून दोरीवर कसरत करणाऱ्या🏂मदारी मुलीला अॅथेलेटीक्समध्ये प्रवेश नाही🤔
✔मासेमारी करत रात्ररात्र पाण्याशी झुंजणाऱ्या भोयाचा🏄🏻जलतरंग🏊🏽 स्पर्धामध्ये समावेश नाही🤔
✔भाल्याने धावत्या रानडुकराचा अचूक वेध घेणारा आदिवासी भालाफेक स्पर्धेत दिसत नाही....
✔गोफणीच्या दोराने अचूक दगड मारणारा शेतकरी तीरंदाज स्पर्धेत असत नाही .....
✔डोक्यावर भर ऊन्हात टनान माल वाहून नेणारा हमाल कधी वेटलिफ्टींग स्पर्धेत दिसत नाही......
अस का होते ?
कारण द्रोणाचार्य त्यांची निवड करीत नाही, *प्रसिध्दी,पैसा,संधी* ही आपल्याच जातभाईंना मिळावी ही त्यांची धडपड असते...
पंचतारांकीत संधी आरक्षण ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी "जातीभेद" केला जातो ही वास्तविकता आहे...
करोडोचे चित्रपट "फ्लॉप" होवूनही अमिताभ बच्चनचा मुलगा "अभिषेक बच्चनला" अनेक करोडोचे चित्रपट सहज मिळतात हे वास्तव आहे...... *का ?*
रिंकु राजगुरूला जबरदस्त जिवंत अभिनय करूनही तिला करोडोचे चित्रपट मिळतील ?
उत्तर आहे *"नाही "*😳
नुकत्याच पार पडलेल्या ज्युनिअर ऑलिंपिक मध्ये गोल्ड मेडल मिळविलेल्या हिमा दास ची गुगलवर तिची जात कोणती हे शोधण्यात सारा देश मग्न होता तिने काय कामगीरी केली हे महत्वाचे नाही. खरे तर अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला आहे व तिला अदयाप मिळालेले प्राईज किती फक्त 50000 रु. कारण गुगलवर कळले तिची जात कोणती तर दलित व लगेच तिने काय कामगिरी केली आहे हे महत्वाचे न ठरता तिला इंग्रजी येत नाही हे ठळकपणे सांगण्यात आले. तसे तर अनेक युरोपियन व एशियन जगजेत्या खेळाडूंना पुरेसे इंग्रजी येत नाही परंतु एका दलिताने केलेल्या कामगिरीला दाद देण्याची मानसिकता नाही. किंबहुना आजचा द्रोणाचार्य ताे अर्जुनापेक्षा श्रेष्ठ बनू नये म्हणुन सुरुवातीलाच त्याचा अंगठा कापून घेतो.
कारण *द्रोणाचार्य* अजूनही जिवंत आहे.....
आणि जोपर्यंत द्रोणाचार्य जिवंत आहे तो पर्यंत प्रत्येक क्षेत्रात "आरक्षणाची" गरज आहे.