पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील व्याख्यानमालेत शिवशाहीर भगवानदादा गावंडेनी पोवाड्यातून मांडले शिवचरित्र
उदगीर - छत्रपती शिवरायांचे राज्य हे मानवतावादी होते.गोरगरीबांना,दीन दुबळ्यांना, शोषितांना वंचितांना न्याय देण्यासाठी शिवरायांनी स्वराज्य उभारले.त्यांचा लढा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हता.तर शोषकांच्या विरोधात होता.त्यामुळे राजांच्या सैन्यात अस्पृश्य,मुसलमानांसह सर्व जातीचे मावळे होते. असे विचार 'पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील,व्याख्यानमाला' अंतर्गत समाजप्रबोधनपर कार्यक्रमात शिवशाहीर भगवानदादा गावंडे यांनी मांडले.पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद व सार्वजनिक शिवजयंत्ती महोत्सव समिती, उदगीर आयोजित कार्यक्रमात त्यांनी शाहीरीच्या माध्यमातून आपले विचार मांडले.पुढे ते म्हणाले की स्वराज्य उभे करताना राजांनी अंधश्रध्दा बाळगली नाही.त्यांनी बहुतांश लढाया या अमावस्येच्या रात्री केल्या.शुभ - अशुभ दिवस पाहून शिवराय लढाई करत नव्हते.हा शिवरायांचा आदर्श आज घेणे गरजेचे आहे.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम,पाणी पुरवठा,रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.अजित पाटील तोंडचिरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उ.बा.समिती उदगीरचे सभापती सिध्देश्वर पाटील, सार्वजनिक शिवजयंत्ती महोत्सव समितीचे सचिव प्रा शिवाजी मुळे, कृ.उ.बा.समितीचे संचालक संतोष बिरादार, प्रा.धनाजी जाधव, जि.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, न.प.सदस्य समीर शेख, रूखमाजी नरले, विशाल पाटील, विद्यासागर डोरनाळीकर, दिलीप केंद्रे,यशवंत बिरादार हे उपस्थित होते.
बबीता पाटील यांच्या जिजाऊ वंदनेने या कार्यक्रमाची सुरूवात झाली.सूत्रसंचलन प्रदीप ढगे यांनी केले तर आभार प्रा.संभाजी जाधव यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद,महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव प्रा.विवेक सुकने, शिवाजी पाटील तोंडचीरकर, उत्तम मोरे, रामेश्वर बिरादार,संदेश आमगे, संदीप जाधव,गणपत गादगे,राजकुमार माने, धनाजी बनसोडे, व्यंकटराव पेटे आदींनी परिश्रम घेतले
शिवशाहीर भगवानदादा गावंडेनी पोवाड्यातून मांडले शिवचरित्र