बच्चू कडू यांचा भिडू तुषार पुंडकर अनंतात विलीन

https://youtu.be/ih6NmCKm3K0https://youtu.be/ih6NmCKm3K0


*बच्चू कडू यांचा भिडू तुषार पुंडकर अनंतात विलीन*
    काल रात्री दहा वाजताच्या दरम्यान अकोला जिल्हा प्रहारचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांचे खंदे समर्थक तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहर पोलीस स्टेशनजवळच  प्राणघातक हल्ला करण्यात आला होता,त्यातच त्यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
   तुषार पुंडकर यांचेवर आजदुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी हजारो लोकांनी एकच गर्दी केली होती. तुषार पुंडकर अमर रहेच्या घोषणांनी आसमंत निनादून गेला होता.
याप्रसंगी राज्यमंत्री बच्चू कडू आणि जिल्ह्यातील इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.काल रात्रीपासून अकोट शहर शोकमग्न अवस्थेत आहे .तूषारचे मारेकऱ्यांना लवकरात लवकर गजाआड करण्यात यावे अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.
*ताज्या बातम्या व लेटेस्ट अपडेट साठी "विद्रोही" न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.*
*#बातम्यांसाठी संपर्क#*
*# मोहन पांडे*
*9730418707*