अंगणवाडी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भगवान देशमुख व सचिव सुमन शिरसाठ यांचा सौ. नागिनबाई पटणे यांच्या वतीने सत्कार संपन्न
उदगीर- महाराष्ट्र राज्याचे अंगणवाडी संघटनेचे अध्यक्ष मा. भगवानराव देशमुख व सचिव सौ. सुमन शिरसाठ यांचा उदगीर तालुक्यातील आदर्श अंगणवाडी शिक्षिका सौ.नागिनबाई पटणे यांच्या वतीने उदगीर येथे आयोजित विभागीय सुपरवायजरच्या बैठक प्रसंगी सत्कार करण्यात आला.यावेळी उदगीर तालुक्यातील सुपरवायजर सौ. आशा सूर्यवंशी, श्रीमती शेख मॅडम, श्रीमती कारामुंगे मॅडम, देवणी तालुक्यातील सुपरवायजर श्रीमती दुरूगकर मॅडम, श्रीमती गुरव मॅडम, श्रीमती मुंडे मॅडम, जळकोट तालुक्यातील सुपरवायजर श्रीमती अक्कनगिरे मॅडम, रेणापूर तालुक्यातील श्रीमती उषा सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते.